Monday, November 4, 2024
HomeUncategorizedलेकीची जबाबदारी पुर्ण ताकदीने पार पाडणार - खासदार प्रतिभा धानोरकर.
spot_img
spot_img

लेकीची जबाबदारी पुर्ण ताकदीने पार पाडणार – खासदार प्रतिभा धानोरकर.

लेकीची जबाबदारी पुर्ण ताकदीने पार पाडणार : खासदार प्रतिभा धानोरकर.

प्रतिभा धानोरकर सर्वसामान्यांच्या आकांक्षा पुर्ण करण्यासाठी काम करावे : आमदार सुभाष धोटे.

राजुरा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा अनावरण आणि खा. प्रतिभा धानोरकर यांचा सत्कार.

चंद्रपूर :- तालुका काँग्रेस कमेटी कार्यालय, गांधी भवन, राजुरा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुर्नाकृती पुतळ्याचे अनावरण आणि नवनिर्वाचित खासदार श्रीमती प्रतिभा बाळूभाऊ धानोरकर यांचा जाहीर सत्कार सोहळा मोठय़ा थाटामाटात पार पडला.

यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या श्रीराम मंदिर राजुरा जवळील जनसंपर्क कार्यालया समोर खा. धानोरकर यांचे आगमन होताच पुष्पवर्षाव करून फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य स्वागत करण्यात आले.

जनसंपर्क कार्यालयातच काँग्रेसचे दिवंगत खासदार स्व. बाळूभाऊ धानोरकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सायंकाळी 7 वाजता भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विविध ठिकाणी पुष्पवर्षाव, पारंपरिक पद्धतीने विविध सामाजिक, धार्मिक संघटना, व्यापारी, नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले.

गांधी भवन येथील तालुका काँग्रेस कमेटी कार्यालय येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुर्नाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यानंतर गांधी चौक येथे नवनिर्वाचित खासदार श्रीमती प्रतिभा धानोरकर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लोकप्रिय आमदार आ. सुभाषभाऊ धोटे, प्रमुख अतिथी आ. सुधाकर अडबाले, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, स्वामी येरोलवार, घनश्याम मुलचंदाणी, जेष्ठ नेते अँड. सदानंद लांडे, महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा निर्मला कुडमेथे, शहराध्यक्षा संध्या चांदेकर, कुंदाताई जेनेकर, सभापती विकास देवाळकर, नंदकिशोर वाढई, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आशिफ सय्यद, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, शहराध्यक्ष संतोष गटलेवार प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी जाहीर सत्काराला उत्तर देताना खा. प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, चंद्रपूर लोकसभेवर नैसर्गिक हक्क प्रतिभा धानोरकर यांचाच असून त्यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी आ. सुभाषभाऊ धोटे यांनी अगदी सुरूवातीपासूनच पक्षश्रेष्ठींकडे पाठपुरावा केला, माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून निवडणूक प्रचारात अथक परिश्रम घेतले. त्यामुळेच मला हे यश गाठता आले. बापाची जबाबदारी त्यांनी पार पाडली आता मी लेकीची जबाबदारी पुर्ण ताकदीने पार पाडणार असून मतदारांनी शेतकर्‍याची लेक म्हणून मला निवडून दिले त्यांमुळे धर्मचे, जाती, पातीचे राजकारण न करता समस्त नागरिकांच्या विकासासाठी, न्यायासाठी, शेतकरी, कामगार, महिला, बेरोजगार अशा सर्व घटकांसाठी काम करेल असा विश्वास व्यक्त केला आणि चंद्रपूर – 13 लोकसभा क्षेत्रातील 6 ही विधानसभा मतदार संघात इंडिया तथा महाविकास आघाडी च्या सर्व आमदारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी परिश्रम घेणार असल्याचे सांगितले.

तर अध्यक्षीय मार्गदर्शनात आ. सुभाष धोटे म्हणाले की, जनसामान्यांच्या मनातील उमेदवार श्रीमती धानोरकर यांच्यासाठी सर्व नेते, कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले आणि त्या अडीच लाखांहून अधिक मताच्या लिडने निवडून आल्यात. येणाऱ्या काळात त्यांनी सर्वसामान्यांच्या आकांक्षा पुर्ण करण्यासाठी काम करावे. क्षेत्रातील जनतेच्या सुख, समृध्दीसाठी काम करून जनतेच्या अपेक्षा पुर्ण कराव्यात असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे यांनी केले. संचालन जिल्हा महासचिव एजाज अहमद यांनी केले तर आभार प्रदर्शन विधानसभा अध्यक्ष उमेश गोणेलवार यांनी केले.

या प्रसंगी काँग्रेस आणि इंडिया तथा महाविकास आघाडी च्या सर्व घटक पक्षातील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका काँग्रेस, शहर काँग्रेस, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस आणि काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशन सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular