चंद्रपूर, 21 जानेव : चंद्रपूर जिल्ह्यात आम आदमी पक्षाचा जोरदार प्रचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज बहुजन वंचित सह अनेक पक्षाच्या युवकांचा आम आदमी पक्षात प्रवेश झाला.
या प्रवेश कार्यक्रमात आम आदमी पक्षाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, संगठन मंत्री शंकर सरदार, वाहतूक संगठना जिल्हा अध्यक्ष महेंद्र ढूमने उपस्थित होते. यावेळी संगम सागोरे यांच्यासह आदित्य साव, विनित तावाडे,विक्की मण्डल, आदी सिडाम,आनंद गेडाम,प्रियांशू, पोयाम,आर्यन रामटेके,रोशन चनकापुरे,श्री जोशी, सुर्याश देवळकर,राहुल गिरडकर,चेतन देवगेड, समिर शेख, आ शेख यांच्या सह अनेकांचा पक्ष प्रवेश झाला.
यावेळी बोलताना आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार म्हणाले की, आम आदमी पक्षाचा उद्देश समाजातील सर्वांचे कल्याण करणे आहे. आम आदमी पक्षाच्या धोरणांमुळेच लोकांना विकासाचा लाभ मिळत आहे. यामुळेच लोक आम आदमी पक्षाकडे आकर्षित होत आहेत.
त्यांनी पुढे सांगितले की, आम आदमी पक्षाचे जिल्ह्यात जोरदार काम सुरू आहे. येणाऱ्या 4 फेब्रुवारीला जिल्हा कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना एकत्र आणून पक्षाचे धोरण आणि कार्यक्रमांची माहिती दिली जाईल.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी आम आदमी पक्षाच्या धोरणांवर विश्वास व्यक्त केला आणि पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.