चंद्रपूर :- चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर जोरगेवार यांची आई गंगुबाई जोरगेवार “अम्मा” यांचे त्यांचे राहते घरी राजमाता निवास, कोतवाली वॉर्ड, चंद्रपूर येथे रविवार दि. 20 ऑक्टोंबर रोजी सकाळी 09.15 वाजता दुःखद निधन झाले.
दिनांक. 21 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 09.00 वा. राजमाता निवासस्थान कोतवाली वॉर्ड येथून दस्तगिर दर्गःह, गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते बिनबा गेट मार्गे अंतिम यात्रा निघून शांतिधाम येथे अंतिम संस्कार होणार आहे.
अम्मावर मागील काही दिवसांपासून नागपूर येथे उपचार सुरु होते प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याने त्यांना घरी परत आणण्यात आले होते परंतु आज सकाळी 9 वाजता त्यांचेवर काळाने झडप घातली आणि त्यांचे दुःखद निधन झाले.