स्थानिक गुन्हे शाखेची बल्लारपूर येथे अवैद्य सुगंधीत तंबाखु विक्रेता विरुद्ध कारवाई*
चंद्रपूर :- स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरच्या पथकाने बल्लारपूर शहरातील अवैध प्रतिबंधित सुगंधित तंबाखू विक्रेत्याच्या खोलीवर धाड टाकत 53,819 रुपयांचा मुद्देमाल जप्त आरोपी निरज शाहू विरुद्ध अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी पो.स्टे. बल्लारपूर हददीत पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरव्दारे खबर मिळाली की, नीरज शाहू, आंबेडकर वार्ड, बल्लारपूर हा किरायची खोली घेऊन त्या ठिकाणी अवैध्यरित्या सुगंधीत तंबाखुचा साठा करुन, बाळगुन विक्री करीत आहे, अशी खात्रीशीर माहीतीवरुन आरोपीचे किरायाचे घरी छापा टाकला यात पोलिसांना सुगंधीत तंबाखुचा साठा आढळून आला असता एकुण 53,819/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपी विरुध्द पो.स्टे. बल्लारपूर येथे अपराध क्रमांक 962 /2024 कलम 223, 275, 123 भा.न्या.सं.2023 सहकलम 30 (2) 26 (2) (पअ), 59 अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात महेश कोंडावार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या नेतृत्वात सपोनि. दीपक काँक्रेडवार, पोउपनि विनोद भुरले, पो हवा. किशोर वैरागडे, रजनीकांत पुट्टावर, सतीश अवथरे तसेच सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर च्या पथकाने केली.